मुदखेड /शहर प्रतिनिधि/ अतीक अहमद
दि. १३जून रोजी मुदखेड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नगरपरिषदेने दिलेल्या ठराविक वेळे मध्ये बसवण्यात यावा या साठी राहुल अप्पा चौदंते यांनी मुदखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे.
मुदखेड शहरामध्ये अनेक वर्षा पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी बौद्ध समाजाकडून अनेकदा निवेदन, आंदोलन, अमरण उपोषण, करून सुद्धा मुदखेड नगरपरिषद या कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
मुदखेड शहरातील मध्यभागी असलेल्या रेल्वे गेट जवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती. परंतु मुदखेड नगरपरिषद व नगर परिषदेमध्ये असलेल्या सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीच्या वेळस आश्वासन देऊन सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला नसल्याने मुदखेड शहरातील बौद्ध समाजा कडून दिनांक २७ सप्टेंबर २०२०रोजी सकाळी २:३० मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसविण्यात आला होता.
परंतु नगरपरिषदेने ताडीने बैठक घेऊन बौद्ध समाजाला या बैठकी मध्ये लेखी आश्वासन दिले होते. की हा पुतळा नियमात बसत नसल्याने पूर्ण कृती पुतळ्याची संपूर्ण पूर्तता करून शासनाच्या नियमाचे पालन करुन या ठिकाणी दोन महिन्यांमध्ये पुतळा बसविण्याचे नगरपरिषदेने लेखी आश्वासन दिले होते. आज नऊ महिने झाले असून सुद्धा या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला नसल्याने २० जुलै२०२१रोजी मुदखेड शहरामध्ये ढोल ताशा लावून मिरवणूक काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात येईल या वेळेस कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला नगरपरिषद जबाबदार राहील असे निवेदन वंचित बहुजन आघाडी कडून दिले आहे.निवेदनकर्ते राहुल अप्पा चौदंते,बालाजी सुर्यतळे पं.स.सभापती मुदखेड,निखिल चौदंते, व या वेळी राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा