युवा क्रांती दल, किसान युवा क्रांती संघटना मुदखेड
मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद
मुदखेड तालुक्यातील खत, बी बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची झाडाझडती घेवून. या प्रसंगी मुदखेड शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना तंबी देण्यात आली.
सध्याला कोरोना महामारीमुळे उद् भवलेल्या भयंकर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड हतबल झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीत देखील शहरातील खते आणि बी बियाणे यांचे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ठरवून दिलेल्या द्या पेक्षा जादा दराने खतांची विक्री करीत आहेत. दुसरीकडे दुकानांमध्ये माल उपलब्ध असूनसुद्धा माल नाही असे सांगून माल उपलब्ध करण्यासाठी जादा पैसे हे व्यापारी आकारत आहेत. म्हणजे मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. जर मालाची टंचाई आहे, तर जादा पैसे देताच माल कसा उपलब्ध होतो असा संतप्त सवाल शेतकऱ्याच्या पोरांनी व्यापाऱ्यांना केला आहे.
हे सर्व चालू असताना प्रशासन मात्र साखर झोपेत आहे. या दोघांनाही जागे करण्यासाठी शेतकरीपुत्रातर्फे आज सत्यशोधमोहीम राबवण्यात आली. यात शहरातील विविध दुकानात जाऊन उपलब्ध मालाची शहानिशा करण्यात आली असता व्यापाऱ्यांची लबाडी उघडी पडली. त्या सर्व व्यापाऱ्यांना धारेवर धरून चौकशी केली. व इथून पुढे देखील हे सर्व असेच चालू राहिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
कृषी अधिकारी मुदखेड यांना युवा क्रांती दल, किसान युवा क्रांती संघटना मुदखेड च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदन देण्यास युवा क्रांती दलाचे सचिव प्रशांत पाटील मुंगल, ज्ञानेश्वर मगरे, नंदकिशोर पा. पवार, शरद पा पवार, शिवम पा मगरे, महेश पा पवार, शिवशंकर पेरके, रा. यु. कौं.चे सरचिटणीस चक्रधर पा कळणे, मनोज झमकडे, विकास कदम तसेच किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पा.शिंदे,पंचायत समिती सभापती शत्रुघ्न गंड्रस, पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील कांजाळकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा