मुदखेड / शहर प्रतिनिधी / अतिक अहमद
मुदखेड शहरातील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाचे कमांडंट लीलाधर महरानीया यांनी आज शहरातील ग्रामीण रुग्णालय मध्ये जाऊन त्या ठिकाणी कोरोनाची पहिली लस घेतली
ज्या प्रमाणे कोरोना व्हायरस लसी घेण्या संबंधी जी भीती आहे ते भीती काढून टाकून सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घेतली पाहिजे आणि मनात कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये कारण आपणास देशातून कोरोना व्हायरस ला हरवून पुन्हा एक जुटीने देशास सक्षम आणि निरोगी आरोग्य बनवण्यासाठी परिश्रम करण्याचे प्रतिपादन या वेळी केले.
या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप फुगारे, साह्यक उप कमांडंट पुरुषोत्तम राजगडकर, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाचे वैदकीय अधिकारी डॉ. मोहम्मद सरफराज, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कपिल जाधव आदींची उपस्थिती होती.
कोरोना लसीकरण मध्ये जाऊन लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली कोरोना लसीकरण विभाग चे प्रमुख डॉक्टर विशाल नागशेटे, डॉक्टर प्रदीप उमनवार, फार्मेसिस्ट प्रदीप कांबले, वैक्सीनेटर अनीता कदम आदीसह लसीकरण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे .
लस घेतल्या नंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप फुगारे यांनी कमांडंट लीलाधर महरानिय यांस लस घेतल्याचे प्रमाणपत्र त्वरित दिले.
यावेळी प्रहार संघटनेचे मूदखेड तालुका अध्यक्ष अनिल शेट्टे ही आज ग्रामीण रुग्णालय मध्ये लस घेतली आणि लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन लस घेण्यासाठी आहवान केले .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा