जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न , बोंबाबोंब आंदोलन.
नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी
दि.७ रोजी इंडिया मेगा ॲग्रो कंपनी विरोधात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर शेतकऱ्यांने अर्धनग्न व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ग्रुप ॲग्रो अनाज कंपनीकडे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल ( हळद, सोयाबीन, हरभरा, मक्का) विक्री केला होता मुदत संपून चार महिने झाले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. कोरोना महामारी मध्ये अनेक शेतकऱ्यांचे नातेवाईक दगावले आहेत. लग्नकार्य मध्ये अडथळा निर्माण झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचे खरीप हंगाम तोंडावर आला आहे तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. या गेंड्याच्या कातडीच्या कंपनी ला जाग आली नाही.या कंपनी ला जाग करण्यासाठी व हक्काचे पैसे मिळवण्यासाठी सर्व अन्यायग्रस्त शेतकर्यांच्या वतीने आज अर्धनग्न , बोंबाबोंब आंदोलन जिल्हाअधिकारी कार्यालया समोर करण्यात आले.
एकच मागणी- शेतकऱ्यांची रक्कम एकरक्कमी द्यावी.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची भेट घेऊन चर्चा करून मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. दत्ता मोरे ,डॉ. सुरेश कदम ,शिवाजी गायकवाड , शहाजी कदम ,कैलास जाधव (उपसरपंच केदारवडगाव ) विनोद वंजारे, नितीन आबादार, विश्वनाथ शिंदे ,साईप्रसाद कानवले,सचिन कदम व अनेक शेतकरी ठिकाणी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा