मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद
दि.७ रोजी मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीझल, गॅस महागाई इंधन दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन व निषेधार्थ लक्षमनराव देवदे यांच्या पेट्रोल पंपा समोर आंदोलन करून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीझल, गॅस महागाई इंधन दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन करीत मुदखेड तहसीलदार यांना लेखीनिवेदन यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले.यावेळी तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
त्याप्रसंगी मुदखेड तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर, शहराध्यक्ष माधवराव कदम, लक्ष्मणराव देवदे, सरचिटणीस रामराव खांडरे, आनंद गादिलवाड, संजय आऊलवार, इमरान मच्छीवाले, चांदु डोकेफोड, सुशील मुंगल, पिंटू ठाकूर, सलाम सर, बालाजी सूर्यवंशी, साहेबराव पावडे, डॉ. शेषराव फुलवरे, निळकंठ पडोळे, दादाराव पुयड, उत्तमराव चव्हाण, रावसाहेब चौदते, चक्रधर पवार, चांदु चमकुरे, बालाजीराव पवार, सुधाकर इंगोले, विजय सूर्यवंशी, रफिक मसालेवाले, आनंदराव पवार, लखन कारले, गोविंद गाढे, संभाजी एडके, भास्कर कळणे, संभाजी गाढे, भिमराव पवार, मादावाड, संभाजी भांगे व शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा