निवघा येथे छञपती शिवाजी महाराज सार्वजनिक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील निवघा येथे छञपती शिवाजी महाराज सार्वजनिक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा शिव स्मारकामध्ये  मोठ्या उत्साहात पार पडला.

 गावातील मान्यवर मंडळींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी शिवप्रेमी कडुन वृक्षारोपणाचा संकल्प हाती घेतला. यासाठी पाण्याची आवश्यकता महत्त्वाची असल्याचे  शिवप्रेमींनी राज्य कर्त्याच्या लक्षात आणून दिले.कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता पंचायत समिती सभापती बालाजी सुर्यतळे व माजी उपसरपंच एम.डी.आटकलवाड यांनी पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था करुन देऊ असे आश्वासन दिले.तत्पूर्वी निवघा गावचे माजी सरपंच मारोतराव पा.पवार यांनी मोटारपंपासाठी वैयक्तिक देणगी दिली.

कार्यक्रमाचे सुञसंचालन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालूकाअध्यक्ष प्रा.संदिप पवार यांनी केले.यावेळी  कॉग्रेसचे तालूकाअध्यक्ष उध्दवराव पवार,शिवसेना नेते विश्वांभर पवार,किसान क्रांतीचे अध्यक्ष सुरज पवार,कट्टर शिवप्रेमी संदिप गोविंदराव पवार,साईनाथ तिडके,सदस्य लखन कारले आदिंची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या