राष्ट्रवादी पदवीधर संघ मुदखेड च्या वतीने मा.ना.श्री.जयंत पाटील यांना दिले लेखी निवेदन

 शालेय विद्यार्थीच्या समस्या सोडवण्याची केली मागणी.

संपादक आशिष मुगटकर



नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

नांदेड येथे रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंञी मा.ना जयंत पाटील साहेब व सामाजिक न्यायमंञी मा.ना.धनंजयभाऊ मुंडे दौऱ्यावर आले होते.

यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे मुदखेड तालूकाअध्यक्ष प्रा.संदिप पवार निवघेकर यांनी तालूक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्याबाबतचे निवेदन ना.जयंत पाटील यांना दिले.

सदरील निवेदनामध्ये तालूक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा पोषण आहार,पाठयपुस्तकांची कमतरता,अपंग विद्यार्थ्यांचे प्रश्न,शालेय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपञ व तसेच काही गावांमध्ये मुलींना मुदखेडला शिक्षणासाठी येण्या-जाण्यासाठी मानव विकास बसची समस्या व मराठा विद्यार्थ्यांना डॉक्टर,इंजिनियर किंवा उच्च शिक्षणासाठी राज्य शासनातर्फे किमान एक लाख ते दोन लाखापर्यंत आर्थिक सवलत द्यावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रा.संदिप पवार निवघेकर यांच्या वतीने देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष  शिवानंद शिप्परकर, आशिष कल्याणे मुगटकर,भोजराज नरडेले,माधव व्यवहारे, प्रशांत कल्याणे,शुभम मुंगल, मंगेश पवार, सुनील मुंगल,जरतारे केशव,गजानन कारलेवाड, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या