मुगट प्राथमीक आरोग्य केंद्रात पालकमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण.

संपादक आशिष मुगटकर



मुगट वार्ताहार

मुगट पाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले.

मुदखेड शहरात विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी विशेष दौ-याचे आयोजन करण्यात आले होते.


त्यावेळी मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास त्यांनी धावती भेट दिली.वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कासराळीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड लसीकरण,सोयी सुविधा विषयी विचारना करून आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची झाडे लावली व त्यांचे संगोपन केल्यामुळे दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कर्मचारीवर्ग यांचे कौतुक केले .

याच दवाखान्याच्या परिसरात आ.अशोक चव्हाण यांच्या आज हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी आ. अमर राजूरकर, गोविंद नागेलीकर, रोहिदास जाधव, संचालक भिमराव कल्याणे, शत्रुघ्न गंड्स, रत्नाकर शिंदे, गणेश शिंदे, रमेश कल्याणे, विलास हाटकर, माधवराव कल्याणे,धाराजी पवार, देवदत्त हाटकर, तुकाराम हाटकर,अनिल कुलकर्णी,धनजय जोशी, नागोराव खानसोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कासराळीकर, डॉ,बेदगुंडे, डॉ.गोवंदे,साळवे, शिंदे,मुक्कावार,खैसर,कराड, सर्व आरोग्य कर्मचारी व परिसरातील कांग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या