बारड भोकर फाटामार्ग वरील खैरगाव पाटीजवळ ट्रॅक्टर इंजिन पलटी होऊन दोघे जण जागीच ठार

 महामार्ग पोलिसांच्या मदतीने मृतदेह उचलले

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

बारड भोकर फाटा महामार्गा वरील बारड  महामार्ग पोलीस केंद्र हद्दीत असलेल्या खैरगाव पाटीजवळ ट्रॅक्टर इंजिन पलटी होऊन दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत किरण च्या सह्याने दोन मृतदेहांना उचलले आहे

खैरगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंप समोरील परिसरात पावसाच्या पाण्याने चिकचीक झाल्याने रस्त्यावरील चिकन मातीच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरल्याने पलटी झाला असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे या दुर्घटनेत सरेगाव येथील रहीवाशी तुषार सूर्यभान कळणे वय १५ वर्षे पुरभाजी मारोती गिरे वय २० वर्षे हे ट्रॅक्टर खाली चिरडले असल्याने जागीच ठार झाले आहेत

पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टर खाली घसरून पलटी खाल्ली असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी यावेळी दिली आहे यावेळी मदत कार्यास महामार्ग सह्यक पोलीस निरीक्षक बालाजी यवते,शेख,स्वाधीन ढवळे,संतोष वागतकर,निलेवार,सातोरे,गणीआमोल सातारे, आदी सह ग्रामस्थानी मदतकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या