परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याला पकडून जंगलात सोडण्याची मागणी
बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मोजी डोंगरगाव येथील सात नंबर कँनोल परिसरातील शिवारातील शेतकरी केशवराव किसनराव पाटील व्यवहारे यांच्या उसाच्या फडातील शेतामध्ये बिबट्या अचानक दीसुन आल्याने परिसरातील शेतकर्यानमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बिबट्याला पकडून जंगलात सोडण्याची मागणी सरपंच शिवानंद पुयड,शेतकरी सूर्यभान व्यवहारे केशव पाटील यांनी यावेळी केली आहे
रात्री वेळी शेतातील नांगरणी काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येत असताना ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रेम केदारे यांना नऊ च्या सुमारास ट्रॅक्टरचा हेडलाईट समोर उसाच्या फडातून बिबट्या बाहेर येत असताना अचानक दिसला त्याला पाहता क्षणी अरे बापरे वाघ असंच म्हणावे लागेल परंतु ट्रॅक्टर च्या फोकस मी पुन्हा बिबट्या चोरून घेत उसाच्या फळांमध्ये मागच्या मागेच सरकला त्यामुळे पुढील घटना टळली आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हाट्सअप मीडियावर जिवंत बिबट्या उसाच्या फडात आढळून आल्याने परीसरात नागरिकांन मध्ये बिबट्या बाबतीत जोरदार चर्चा रंगली आहे.
या परिसरात बिबट्या ने अनेक दिवसापासून बस्तान मांडून ठेवले असल्याने याठिकाणी अनेक घटना घडामोडी जनावराच्या शिकारी केलेल्या घटना घडल्या आहेत.तर आठ दीवसापासुन हा बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना आढळून येते असल्याने शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतावर कामासाठी जाणाऱ्या ना भिती वाटत असल्याने कामाचा खोळंबा झाला आहे तर आखाड्यावरील राहणार्यांना या बाबत चिंता लागली आहे.तर शेतकर्याचे शेतातील जनावरांन वर हल्ला होईल या भिती सतावत आहे.
वनविभागाने याकडे गांभीर्य घेत परीसरात तर गाव शिवारात आढळणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा