मुगट वार्ताहर
मुगट येथील जिल्हा परिषद शाळेचा या वर्षीचा ऐतिहासिक गुण घेऊन विद्यार्थीनीं उत्तीर्ण झाली आहे. तर दुसरीकडे शाळेचा निकाल 87.67% ऐवढा लागला आहे.
दहावी परीक्षेस शाळेतून एकूण 73 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 64 विद्यार्थी दहावी परीक्षा पास झाले आहेत. त्यात विशेष प्राविण्य घेऊन 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 23 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये 27 विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणी मध्ये 2 विद्यार्थी असे एकूण 64 विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेमध्ये सर्वप्रथम हाटकर राजकन्या गौतम 95.60% द्वितीय गंगाधर पल्लवी साईनाथ 93.60% तृतीय अजय विजय वाकडे 87.50% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, संचालक आदींनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा