नांदेड जिल्हा प्रतिनिधी
भारत तिब्बत सहयोग मंचच्या वतीने चीनच्या ताब्यात असलेले कैलास मानसरोवर तिबेट मुक्ती संकल्प यज्ञ उत्साहात पार पडला.या वेळी देवगिरी प्रांत महामंत्री सनतकुमार महाजन,जिल्हा अध्यक्ष भास्कर डोईबळे,हा संकल्प यज्ञास पुरोहित म्हणून नारायण कुलकर्णी,सुरेश लंगडापुरे,सविता गबाळे यांची प्रमुख उपस्थित होते.
याबाबतीत सविस्तर वृत्तांत असे की दि.९ मे सकाळी ९ वा.भारत तिबेट सहयोग मंच,पतंजली योगपीठ परिवार,स्वामी समर्थ मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे पाच कुंडी संकल्प यज्ञ आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी भारत तिबेट मंचचे देवगिरी प्रांत महामंत्री सनत कुमार महाजन मार्गदर्शन करताना आपल्या देशाचा परंपरागत बंधू असलेला देश तिब्बत आज सुद्धा चीनच्या ताब्यात आहे.१९५२ मध्ये चीन पाय पसरायला सुरुवात केली,तदनंतर १९५८ मध्ये संपूर्ण तिबेट ला चीनने ताब्यात घेतले आणि ते तिबेट ला परतंत्र केले.आपल्या संस्कृतीतला अविभाज्य बौद्ध पंथ हा तिबेटचा अध्यात्मिक पंथ आहे,त्या ठिकाणाहून अशा प्रकारच्या सर्वप्रथम वस्तू,गोष्टी व संस्कृती चीनने हळूहळू संपूर्ण नष्ट केली. म्हणून या सर्व प्रकारचे संरक्षण करायचे असेल तर तिबेट हा चीन पासून मुक्त झाला पाहिजे, तिबेट मुक्त झाला म्हणजे कैलास मानसरोवर ही मानाचे पवित्र स्थान ही मुक्त होणार आहेत.चीन हा भारताच्या शेजारी कधीच नव्हता चीन आणि भारतामध्ये तिबेट हा देश होता त्याचबरोबर भारताचा ४००००स्क्वेअर फुट भूभाग चीनच्या ताब्यात गेलेला आहे. हा भूभाग चीनच्या पराधीनतेपासून मुक्त करण्यासाठी म्हणून सबंध हिंदुस्तानच्या १४० कोटी जनतेच्या मनात संकल्प जागृत व्हावा म्हणून हा महासंकल्प यज्ञ संपन्न केला आहे.
दि.५ मे हा भारत-तिबेट सहयोग मंच चा स्थापना दिवस आहे.त्याच अनुषंगाने या सप्ताहात हा संकल्प अभियान राबवत आहोत अशी प्रतिपादन करण्यात आलेतर यजमान म्हणून सपत्नीक भास्कर डोईबळे, प्रल्हाद घोरबांड ,प्रेमानंद शिंदे, बोडके गणेश,राजेश्वर चेडगुलवार,शिवदास डोईबळे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा