कंधार तालुका प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील कौठा बारुळ येथील कै.शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला. या महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.कै. शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98:50% लागला आहे.
यामध्ये विज्ञान शाखेतुन मठवाले शिवगंगा 85:17% द्वितीय पवळे क्रष्णा75;33% कला शाखेतुन शैख निगार 80:33% द्वितीय सुर्य वंशी पुजा 78:83% विज्ञान शाखेचा 100% निकाल लागला असून तर कला शाखेचा 98% निकाल लागला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव शिवकुमार देशमुख संस्थेच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य धुमाळे सर यानी सर्वांचे अभिनंदन केले यावेळी सर्व शिक्षक & शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा