मंदिर उघडण्यास व भजन ,कीर्तनाला परवानगी द्या-राष्ट्रीय वारकरी परिषद ची मागणी

संपादक आशिष मुगटकर


कंधार तालुका प्रतिनिधी/साईनाथ काळवणे.

संपूर्ण देशासह राज्यात सर्वच क्षेत्रातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासन परवानगी देत आहे पण मंदिर चालू करण्यास व त्याच पार्श्वभूमीवर भजन, कीर्तन व प्रवचनास शासनाने परवानगी देण्याची मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद कंधारच्या वतीने वतीने करण्यात आली.

राष्ट्रीय वारकरी परिषद कंधार यांच्यावतीने तहसीलदार कंधार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सध्या सर्वच क्षेत्रातील उद्योगधंदे शासनाच्या नियम व अटीचे पालन करून हळूहळू सुरळीत होत आहे. त्याच धर्तीवर कोरोनामुळे इतिहासात प्रथमच मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत व वारकऱ्यांना भजन कीर्तन करण्यास मनाई आहे. जसे इतर उद्योगांना नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार वारकन्यांना ही शासनाच्या ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार मंदिर उघडण्यास ,भजन व कीर्तन करण्याची रीतसर परवानगी द्यावी .असे निवेदन देण्यात आले.

    निवेदनावर ह.भ.प.मृदंगचार्य सत्यम महाराज केंद्रे( तालुका अध्यक्ष कंधार),ह.भ.प. व्यंकटी महाराज हाडोळीकर (उपाध्यक्ष) ह.भ.प. रामलिंग महाराज मठपती (तालुका सचिव),ह.भ. प. शंकर महाराज होनराव (तालुका संघटक) ,ज्ञानोबा हनमंतराव घुगे(सदस्य ) ज्ञानेश्वर चोपदार ( कोषाध्यक्ष )वैजनाथ घुगे,गंगाधर घुगे   यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या