मुदखेड / तालुका प्रतिनिधी
महानुभाव पंथाचे संस्थापक परब्रम्ह परमेश्वर अवतार,समाजउद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी १२ व्या शतकात अवतार धारण करून महानुभाव पंथाची स्थापना केली समाजातील अनिष्ट,रूढी, प्रथा-परंपरा विरुद्ध, समाज सुधारत स्त्री पुरुष समानतेचा पंथात पालन करणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्ठशताब्दी वर्ष व स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे अवलिया परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू अवतार दिन आज दि १८ सप्टेंबर २०२१ रोज शनिवारी कामळज ता मुदखेड येथे मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला
या महोत्सवाची सुरुवात दि ११ शनिवार रोजी महंत श्री चिरडे बाबांच्या भागवत कथेच्या सप्ताहाने झाली सात दिवस कामळज परिसरातील असंख्य धर्म प्रेमी बंधू भगिनींने लाभ घेत सर्व परिसर भक्तिमय झाला होता
दि १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी महंत श्री चिरडे बाबांच्या भागवत कथेचे समारोप झाला तद्नंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित राहून सर्व साधू संत आणि उपस्थित जनतेशी संवाद साधून महानुभाव पंथातील वादग्रस्त असलेल्या नांदेड येथिल श्री चक्रधर स्वामी चारणांकित द्विजगोरक्षन संदर्भात सकारात्मकता दर्शविली व रिद्धपुर येथिल श्री चक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापनेच्या बाबतीत चर्चा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यास परमेश्वराणे मला आशीर्वाद द्यावा हे काम माज्या हातून घडन्याचे मला भाग्य लाभावे मी महानुभाव पंथाच्या सर्व प्रश्नांसाठी तुमच्या सोबत असल्याचे सांगून प्रसंगी सर्व पंथीयांना शुभेच्छा दिल्या
सायंकाळी ५ वाजता कुलवंदनाची भव्य पालखी मिरवणूक व यात पंथातील आम्नाय महंत श्री ज्ञानभास्कराचार्य भास्कर बाबाजी नंदुरबार शहादा,आचार्य श्री यक्षदेव बाबाजी शास्त्री श्री क्षेत्र रुद्धपुर उत्तरकाशी,श्री आचार्य कारंजेकरबाबाजी कवीश्वर कुलाचार्य अमरावती, श्री आचार्य माहुरकर बाबाजी शास्त्री पिठाधिस श्री क्षेत्र माहुर ,श्री आचार्य कापुसतळणीकर बाबाजी श्री क्षेत्र दक्षिण काशी फलटण यांची शोभायात्रा काढून त्यात श्री कृष्णराधा,श्री चक्रधर स्वामी व गोविंद प्रभू महाराज यांची झाकी व भजन ,कीर्तन आणि ढोल तास ताश्याच्या गजरात सर्व गावभर भक्तिमय वातावरणात निर्माण झाले .
दि १८सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे पाच वाजता कुलवंदनास मंगलस्नान, स.८ वाजता आचार्य श्री यक्षदेव बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण, आचार्य श्री कारंजेकर बाबा च्या हस्ते सभामंडप उदघाटन आणि कार्यक्रम अध्यक्ष आचार्य श्रीभास्कर बाबा भोजने कार्याध्यक्ष आचार्य श्री कापुसतळणीकर बाबांनी उपस्थित धर्म प्रेमींना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व गोविंद प्रभू महाराजांच्या लीळा सांगून धर्मोपदेशक केला .
या कार्यक्रमाचे आयोजक गोपीनाथ पाटील, परशराम पाटील,भीमराव पाटील,विश्वाम्बर पाटील,बाबाराव पाटील,माधव पाटील,सुदाम पाटील पडोळे यांनी केले
या प्रसंगी या सात दिवसांत अनेक संत,महंत, राजकीय,सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तीने भेटी दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता माजी सरपंच नागोराव पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली व गावातील सर्व जनतेच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा