मुदखेड / तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पहिल्या प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सरपंच मारोती पा.जाधव हे होतेे.
ध्वजारोहण ग्रा.प.सदस्य शंकर पांचाळ व ग्रामविकास अधिकारी गिरीधार मोळके यांच्या हस्ते करण्यात आले . प्रतिमा पुजन सर्व मान्यवरांनी-मा.सरपंच संदिप गोनेवाड,मा.उपसरपंच बापुसाहेब शिंदे,मा.ग्रा.सदस्य सदाशिव गोनेवाड,चंपती हनुमंते,संभाजी पैलवान,से.सो.सदस्य गेंदु हनुमंते यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सुरुवात ह.भ.प.व्यंकट महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यातआले,जयंती मंडळाच्या वतीने सेवानिवृत गट शिक्षण अधिकारी बालाजी गुरुजी जाधव,गंगाधर गुरुजी सोनटक्के,दिनकर गुरुजी हनुमंते,शिवराम गुरुजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात अला.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मान्यवरांनी दिनकर हनुमंते गुरुजी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बालाजी जाधव,मा.सरपंच मारोती जाधव,हभप व्यंकट महाराज, लहान बालकांनी प्रकाश टाकलायावेळी मुदखेड पोलीस जमादार पवार साहेब,सुरनर साहेब,कन्याशाळेचे बोफेवार सर गावातील बालाजी जाधव ,यशवंत जाधव ,बाबाराव जाधव,बळवंत जाधव,नागेश जाधव,गुलाब जाधव ,परमेश्वर जाधव,संजय जाधव, चक्रधर शिंदे ,साईनाथ शिंदे,शामराव हनुमंते,मारोती गोनेवाड व अजमोदीन शेख आणि समाज बांधव माता भगीनी सर्व मंडळी उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष रमेश सोनटक्के,नागेश सोनटक्के,ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा