मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड पंचायत समिती कडुन आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा कै.शंकरराव चव्हाण सभागृहात मोठ्या थाटात पार पडला.
अध्यक्ष स्थानी गट विकास अधिकारी श्रीकांत बेळदे हे होते तर नायब तहसीलदार संजय नागमवाड यांची विशेष उपस्थिती होती.
नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण देवदे, ग्राम सेवक कळणे , गव्हाणे गोपाळवाडीकर , संजय कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी गायकवाड,न.प राज्य कर्मचारी संघटनेचे रामेश्वर वाघमारे हे प्रमुख उपस्थिती होती .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा