पाथरड (रेल्वे) शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करुन वाढदिवस साजरा

.संपादक आशिष मुगटकर



 मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील पाथरड (रेल्वे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यी  कुमार पुष्पक आनंदा थोरात ह्यांनी आपल्याच व शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन वाढदिवस साजरा केला.

 या निमित्ताने विद्यार्थ्यांचे वडील श्री आनंद थोरात व्यवस्थापन समिती सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक श्री हरीओम सर यांच्या विनंतीला मान देऊन गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच श्री कैलास  पाटील उपसरपंच श्री जयवंत थोरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी दत्तराव पाटील व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री संतोष राजमोरे सर,व्यवस्थापन समिती सदस्य श्री व्यंकू मेटकर तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. 


या कार्यक्रमांमध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून श्री आनंद थोरात यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते केले.हा वाढदिवसाचा कार्यक्रम परिपाठा नंतर लागलीच घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये गावचे कर्तव्यदक्ष सरपंच कैलास पाटील यांनी विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना यापुढे पण अशाच प्रकारे आनंद थोरात यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा जो पायंडा पाडला  आहे त्यातून प्रेरणा घेत राहण्याची घोषणा केली.



त्यानंतर गावचे उपसरपंच श्री जयवंत थोरात यांनी मार्गदर्शनपर बोलत असताना प्रस्तुत शाळेचे शिक्षक श्री कल्याणकर सर व श्री शेवाळकर सर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अभिनंदन करत त्यांच्या अध्यापनाचे तसेच उपस्थिती वाढवण्यासाठी करत असलेल्या  कामाचे कौतुक केले. एकंदर शाळेच्या होत असलेल्या गुणवत्ता विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.

त्यानंतर व्यवस्थापन समिती सदस्य श्री लिंगू मेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनुभव सांगितले. विद्यार्थीदशेत असताना त्यांना एकदाही  व्यासपीठावर यायची संधी मिळाली नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शालेय जीवनात तर नाहीच पण विद्यालयीन जीवनात सुद्धा कधीच अशी संधी न मिळाल्याने आजही मी व्यवस्थित बोलू शकत नाही असे  निसंकोच प्रांजळ मत त्यांनी मांडले. त्यांच्या तुलनेमध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरड [रेल्वे ] शाळेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्टेजवर येतात ,सुंदर अशी भाषणे करतात याबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व स्टाफचे कौतुक केले . तसेच यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना असेच  व्यासपीठ मिळवून देण्याचे शालेय प्रशासनाला आवाहन केले.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेच्या एकूण ४७ विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केली होती. त्यादिवशी पाऊस चालू असल्यामुळे ही भाषणे घेता आली नाहीत. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात मराठी इंग्रजी व हिंदी अशी ५ भाषणे घेण्यात आली..

यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री हरिओम सर यांनी सभेस मार्गदर्शन करत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या समाज कार्यामध्ये जो कोणी आपल्या पाल्याचा वाढदिवस साजरा करेल त्यांनी शाळेसाठी एक झाड व एक जाळी देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला लागलीच ज्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा होत आहे त्या आनंदा थोरात [ व्यवस्थापन समीती सदस्य ] यांनी प्रतिसाद देत पुढील दहा ते अकरा दिवसांमध्ये जाळी व झाड देण्याचे आश्वासन समस्त सभेला दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री कल्याणकर सर यांनी केले तर सबंध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सहशिक्षक श्री येमेकर सर, पांचाळ सर, श्रीमती मैराळ मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री हरी ओम सर यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या