तालुका सचिवपदी सुरेश सुर्यवंशी यांची निवड
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड शासकीय विश्रामगृह येथे बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय कोष्याध्यक्ष बालाजी गजले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते मुदखेड तालुका अध्यक्ष पदी बाबुराव मस्के तर तालुका सचिवपदी सुरेश सुर्यवंशी यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र पुष्पहार घालून पुढिल कार्यासाठी शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
यावेळी पांडुरंग झुंजारे तालुका प्रभारी, पत्रकार प्रल्हाद मस्के, पुंडलिक व्ही सुर्यवंशी, दत्ता सुर्यवंशी, ग्याणू सुर्यवंशी, लक्ष्मण सुर्यवंशी, मारोती सुर्यवंशी,अमोल सुर्यवंशी,चंद्रकांत राहेरे, दत्ता वाघमारे, ,संतोष धोतरे,अविनाश मस्के नवीन पदाधिकारी यांच्या निवडी सर्वत्र स्वागत होत आहे.
मुदखेड तालुक्यातील सर्व गावात पक्ष बांधनी करून महापुरुषांच्या विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचून बहुजन समाजातील सामाजिक, राजकीय हक्कांसाठी मुदखेड तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी कार्य करनार असल्याचे बाबुराव मस्के व सुरेश सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा