संस्थेच्या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक !
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जी.के.इंग्लीश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष किशनराव पाटील कल्याणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ यशोमती पाटील लंगोटे,सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिनिधी, तंटामुक्ती अध्यक्ष, पालक, गावातील नागरिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
संस्थेच्या वतीने एक नवीन उपक्रम राबवत. कामगार दिनाचे औचित्य साधत गावातील कोरोना काळात आपले कर्तव्य पार पाडलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पल्लवी हाटकर तर आभार सौ.योगिता मुंगल यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा