पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी भव्य मोटारसायकल रॅली व ५ जुन रोजी अभिवादन सभेचे आयोजन.

 हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा ; जन्मोत्सव समितीचे आवाहन


नांदेड जिल्हा/प्रतिनिधी 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला भारतभर विस्तारीत करणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती, नांदेडच्या वतिने ३१ मे रोजी भव्य मोटारसायकल रॅली आणि ५ जुन रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.



३१ मे रोजी भव्य मोटारसायकल रॅलीची सुरुवात सकाळी १० वा. शिव मंदिर, चैतन्य नगर, नांदेड येथुन होणार आहे. या मोटारसायकल रॅलीचे उद्घाटक म्हणून आमदार बालाजी कल्याणकर तर यावेळी डॉ. राम मदने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या रॅलीच्या समारोप गोपाळचावडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. याचं ठिकाणी समारोप सभा होणार आहे. या समारोप सभेला आमदार मोहन हंबर्डे, अमरनाथ राजूरकर हे उपस्थित राहणार आहेत. सभे नंतर अन्नदानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. 

दि.५ जुन रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ यशपाल भिंगे हे राहणार आहेत तर प्रमुख उद्घाटक म्हणून पालकमंत्री अशोकराव चव्हाण, मुख्य व्याख्याते म्हणून होळकरशाहीचे अभ्यासक रामभाऊ लांडे (अंबड जि. जालना), विशेष अतिथी म्हणून राज्यमंत्री दत्तामामा भरणे, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. फौजिया खान, विकास महात्मे तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी कल्याणकर, मोहन हंबर्डे, अमरनाथ राजूरकर, जितेश अंतापुरकर, जयश्रीताई पावडे तर छत्रपती कानोडे, माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, विजय पाटील, दिलीप बंदखडके, गंगाप्रसाद काकडे, बबन वाघमारे, राजु गोरे, सखाराम तुप्पेकर, लक्ष्मणराव देवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे तरीही दोन्ही कार्यक्रमांस अहिल्याप्रेंमीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती, नांदेडच्या वतिने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या