मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूचा निषेध.



  
 नांदेड/प्रतिनिधी/आशिष कल्याणे
                           मुदखेड  राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून खासदार उदयन राजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्व पदाची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या घोषणे बद्दल राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला याबद्दल त्यांना ५००पोस्ट कार्ड देवुन निषेध व्यक्त केला गेला.
नवी दिल्ली येथे नवनियुक्त राज्यसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम काल(बुधवार) रोजी पार पडला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला होता. शपथविधी सुरू असताना घोषणा देण्यास परवानगी नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, यावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वर सोशल मीडियातूनही शिवप्रेमींकडून टीका होत आहे. याचा निषेध व्यक्त करत.
 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना "जय भवानी जय शिवराय" लिहलेले ५०० पोस्ट कार्ड आज पाठवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या