कारगिल विजय दिवसानिमित्त नांदेड येथे वृक्षारोपण


 
नांदेड/प्रतिनिधी/आशिष कल्याणे
26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून आपण ओळखतो कारगिल युद्धात शहीद झालेले जवानांना श्रद्धांजली वाहतो व झालेल्या विजयचं आनंद उत्सव साजरा करतो. पण नांदेडचे विविध संस्थांनी हा दिवस वेगळ्या रीतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन देशासाठी सध्याची गरज काय आहे हे पाहता हरित नांदेड हा संकल्प घेऊन वृक्षारोपण केले. नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या सहाय्याने शिवाजीनगर येथील नाना-नानी पार्कमध्ये वृक्ष मित्र परिवार, निफा व वीर सैनिक ग्रुप या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. 
नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट व ऍक्टिव्हीस्ट (निफा) या राष्ट्रीय स्तराच्या संस्थेला वीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रम व योजना राबवण्याचा या संस्थेने ठरविला आहे याचाच एक भाग म्हणून पूर्ण भारत देशामध्ये वर्षभरामध्ये वीस लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प देखील घेतला आहे. त्याचीच सुरुवात म्हणून कारगिल विजय दिवस हा निवडून भारतामध्ये असलेल्या निफा च्या विविध शाखांमध्ये हा कार्यक्रम राबवला गेला आहे.
युवकांच साथ या अशा योजनेला मिळत राहावं अशी अपेक्षा महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक डॉ. फराहद बैग यांनी केली. निफा चे प्रेरणास्थान हर्षद शहा यांनी युवकांच्या सहायाने अशा योजना पूर्ण केल्यास त्याला मोठे रूप मिळेल व चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल असे वक्तव्य यावेळेस त्यांनी व्यक्त केले. यासोबतच भराडिया प्रीतम यांनी वृक्षमित्र आनंदवन घनवन संकल्पनेची माहिती युवकांना दिली व त्याच्या मुळे होणारे फायदे देखील सांगून पुढील आणखीन या कार्यास आणखीन मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

 वीर सैनिक ग्रुपचे सैनिक प्रवीण देवडे आपल्या  युवकांच्या समूहासोबत याच्यात सामील झाले एक हात मदतीचा एक हात सुरक्षेचा ह्या संकल्पनेने  नांदेडमध्ये अनेक वृक्षारोपण करून हरित नांदेडचा संकल्प त्यांनी घेतला. निफा चे प्रदेशाध्यक्ष डॉ. भरत जेठवाणी यांनी असे कार्यक्रम व हा उपक्रम वर्षभर राबवण्याचे संकल्प घेतले तर वृक्षारोपण करून त्याला संगोपन करण्याची देखील गरज आहे असे मत यावेळेस त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी निफा चे  राज्य कार्यकारी सदस्य राजीव जैन, निफा चे जिल्हाध्यक्ष भास्कर डोईबळे, सचिन जोड, अतुल दोंगावकर, प्रल्हादजी घोरबांड विविध संस्थेचे सदस्य एवं वृक्ष मित्र या वेळेस उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या