वेलिंग्टन विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के , गुणवत्ता हीच ओळख



नांदेड/प्रतिनिधी/आशिष कल्याणे
      नांदेड येथील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संजीवनी सेवाभावी.या सेवाभावी संस्था कडून चालू असलेले वेलिंग्टन विद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, या वर्षीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2020 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत वेलिंग्टन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या निकालाने पुन्हा एकदा विद्यालयाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे.या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी  ऋतिका सोमनाथ स्वामी ही विद्यार्थिनी.97% गुणांसह उत्तीर्ण होऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान तीने मिळवला आहे.तर शिवम मुंजाजी जोगदंड द्वितीय 96.40%, आला आहे.विनायक ज्ञानोबा तेलंग   95.20%, त्रितीय आला आहे.शुभम मुंजाजी जोगदंड 95%,संस्कृती संजीव सागरे 94.20%, अश्विनकुमार वसंत देशमुख 94%, राजन मधुकर कदम 93.80%, हरीओम दत्तात्रय झरीकर 93%, प्रथमेश नवलविजय  पवार92.20%,राजन मोतीराम शिंदे91.20, लक्ष्मण विष्णू जाधव 91%, सुदर्शन शंकर माने 90.20%,प्रतिक्षा राजू काकडे 90%, रुद्राणी शिवलिंग स्वामी90%  गुणांसह 22 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
वेलिंग्टन विद्यालयातील विशेष प्रावीण्य सह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय शाळेतील नियोजनबद्ध अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व नियमित सराव परीक्षा यामुळेच हे शक्य झाले आहे असे मत व्यक्त केले.
वेलिंग्टन विद्यालयाच्या  या यशाबद्दल संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार निळकंठराव पावडे, अशोक जवादवार ,सौ. सिंधुताई पावडे, ,अध्यक्ष विनोद पावडे, उपाध्यक्ष वैशाली देशमुख, विशाल पावडे, सहसचिव वर्षाताई पावडे, सौ दिपाली पावडे, इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य चलपती राव, विद्यालयाचे प्राचार्य सतीश सिरसाठ, हनुमान चंदेल, प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या