मुगट जिल्हा परिषद हायस्कूल चे दहावीच्या परीक्षेत यश.

अभिनंदन:- साक्षी कल्याणे दहावीच्या परीक्षेत ८२.५० टक्के गुण घेतल्यामुळे तिचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे, शिक्षक शंकर गोरडवार, किशनराव कल्याणे ,आशिष कल्याणे, सदाशिव कल्याणे, आनंदराव कल्याणे


नांदेड/ प्रतिनिधी/आशिष कल्याणे
           
     मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात यश संपादन करून शाळेचा निकाल यावर्षी वाढला आहे. शाळेचा एकूण निकाल एकंदरीत ६७. ६९ टक्के एवढा लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी च्या शाळेच्या निकालात १९.०६ टक्क्याची वाढ झाली आहे यावर्षी शाळेचे ०६ विद्यार्थी विशेष प्रावीण्य घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण, सर्वसाधारण०८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून प्रथम साक्षी आनंदराव कल्याणे ८२.५० द्वितीय सरिता दत्ता पंचाळ ८०. २४टक्के, धनंजय शिवाजी कल्याणे ७१.४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

 साक्षी कल्याणे ८२.५० टक्के,

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुगट गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अरुणा कल्याणे, मा. जिल्हा परिषद सदस्या अर्चना हाटकर, मा. सभापती शोभाताई मुंगल, मा. सरपंच सुशीला पवार, सरपंच सुमनबाई कल्याणे, मा, उपसरपंच रमेश कल्याणे, ग्राम विकास अधिकारी एकनाथ कदम ,मा. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा पाटील कल्याणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद कल्याणे, पोलीस पाटील भगवान हाटकर ,शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे, सहशिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 सरिता दत्ता पंचाळ ८०.२४टक्के, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या