सीएससी(CSC) केंद्रचालकाने केली शेतकऱ्यांची फसवणूक.

  बनावट पिक विमा पावती देऊन १८६७५ /- रुपयाचा केला अपहार.

  

 नांदेड/ प्रतिनिधी /आशिष कल्याणे
              नांदेड शहरातील पीर बुरहाननगर येथील सीएससी(CSC) केंद्र चालक सय्यद अक्रम अली याने  खरीप हंगाम २०१९ मध्ये एकदरा या गावातील १८ शेतकऱ्यांना पिक विमा हप्ता भरलेल्या बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक करुन१८६७५/- रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
एकदरा गावातील १८ शेतकऱ्यांनी नांदेड येथील सी.एस.सी(CSC) केंद्रावर खरीप हंगाम २०१९ मध्ये पिक विमा हप्ता भरला व १८६७५/- ऐवढी हप्त्याची रक्कम केंद्र चालका कडे जमा केली.पिक विमा हप्ता भरल्याची पावती शेतकऱ्यांना दिली ती बनावट. हे शेतकऱ्यांच्या  लक्षात आले नाही.परंतु जेव्हा २०२० मध्ये शेतकऱ्यांना पिक विमा लागू झाला तेव्हा अनेक शेतकरी बँकेत जाऊन  चौकशी करत होतो. एकदरा या गावातील हे १८ शेतकरी सुद्धा आपल्याला पिक विमा मिळाला असेल या आशेपोटी बँकेकडे गेले होते.परंतू बँकेने त्यांना तुमच्या पीक विम्याचे पैसे बँकेत जमा झाले नाही असे सांगितले. शेतकऱ्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. त्यांनी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला संपर्क केला असता, त्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना सांगितले की तुमचा पिक विमा कंपनीकडे भरला गेला नाही. म्हणून तुम्हाला पिक विमा मिळणार नाही. शेतकरी पुन्हा ऐकदा जिल्हा समन्वयक सीएससी(CSC) यांच्या कडे गेले व त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. पिक विमा हप्ता भरलेली पावती त्यांना दाखवली तेव्हा त्यांनी त्या पावत्या बनावट असल्याचे सांगितले. एकदारा येथील १८ शेतकऱ्यांना जेव्हा समजले की आपली  फसवणूक झाली आहे.तेव्हा त्यांनी नांदेड तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे धाव घेवून सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेऊन या सीएससी (CSC) केंद्र चालकाच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपासणी चालू आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या