नांदेड /प्रतिनिधी / आशिष कल्याणे
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदनात छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, अशी घोषणा चालणार नाही ! म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचा त्यांनी अपमान आहे. असे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी म्हटले आहे.त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड तालुका व शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन जाहीर निषेध व्यक्त केला व तसेच मुदखेड तहसीलदार झंम्पले यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती प्रतिनिधी पिंटू पाटील वासरीकर,भोकर विधानसभा अध्यक्ष विश्वंभर पाटील पवार,उपप्रमुख आनंदराव पाटील जाधव, गोविंद पाटील शिंदे ,संचालक सुरेश शेट्टी, शहर प्रमुख सचिन पाटील माने,शहर प्रमुख सचिन चंद्रे,उपतालुकाप्रमुख गुलाबराव देशमुख,गंगाधर पाटील मगरे, संघटक सुधीर सूर्यवंशी,अंकुश मामिडवार,संजय पाटील गाढे, सोनू अरपल्लू, विलास पाटील कल्याणे, भिमराव पवार आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
संत कृष्णामाता संजीवनी समाधी सोहळा संपन्न.
नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याने संत कृष्णामाता संजीवनी समाधी सोहळा संपन्न. मुदखेड तालुक्यातील मुगट येथील संत कृष्णा माता यांचा संजीवनी समाधी सोहळा विधीवत पूजन करून संपन्न झाला. कोरोनाजीची परिस्थिती असल्यामुळे यावेळी गावात मोठ्या प्रमाणावर भक्तमंडळी येऊ शकली नाही तरीपण नियमाचे पालन करत गावातील प्रमुख रस्त्याने संत कृष्णामाता पालखीतून विराजमान होवून. गावातील मुख्य मंदिराचे दर्शन घेत संत कृष्ण माता यांची पालखी मंदिरात शेवटी परतली. गावातील प्रमुख मंदिरा पैकी संत कृष्णमाता मंदिर हे एक असून या ठिकाणी मातेची जिवंत समाधी घेतली आहे. मातेने याठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी जिवंत समाधी घेऊन पंढरपूर येथील आषाढी वारी ला गेलेल्या गावातील भक्तांना चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या दिवशी भेट दिली व दृष्टांत दिला अशी आख्यायिका संत कृष्णामातेची सांगितली जाते. आजही आपल्या भक्तांना वेळोवेळी ती धावून येते भक्तगण आपला अनुभव सांगतात.
पाटनूर येथील युवकांना अजगराचे छायाचित्र पडले महागात.
नांदेड/ प्रतिनिधी /आशिष कल्याणे मुदखेड तालुक्यातील पाटनूर येथील एका युवकाने गावातील व्हाट्सअप ग्रुप वर मारलेल्या अजगराला ओढून नेतानाचे छायाचित्र टाकने चांगलेच महागात पडले आहे. गावातील ग्रामपंचायत या नावाने हा व्हाट्सअप ग्रुप चालतो. या मारलेल्या अजगराचे छायाचित्र पाहून या घटनेची वनविभागा कडून स्वतःहून गंभीर दखल घेतली गेली. पाटनूर गावातील सात जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परमेश्वर कोकाटे,सटवाजी डुमणे,राजू गायकवाड,पंडित कोकाटे,आप्पाराव कोकाटे, रामा पतंगे, नागोराव मिरासे यांचा समावेश आहे. सदरील या गुन्ह्याची आरोपींनी कबुली ही दिली. उपवनरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सोबत सहाय्यक वनरक्षक डी.एस.पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, सचिव रामपुरे,वनपाल पी.ए धोंडगे,बी.ए. हदकळे आदी कर्मचारी सहभागी होते.
मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूचा निषेध.
नांदेड/प्रतिनिधी/आशिष कल्याणे मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून खासदार उदयन राजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्व पदाची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या घोषणे बद्दल राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला याबद्दल त्यांना ५००पोस्ट कार्ड देवुन निषेध व्यक्त केला गेला. नवी दिल्ली येथे नवनियुक्त राज्यसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम काल(बुधवार) रोजी पार पडला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला होता. शपथविधी सुरू असताना घोषणा देण्यास परवानगी नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, यावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वर सोशल मीडियातूनही शिवप्रेमींकडून टीका होत आहे. याचा निषेध व्यक्त करत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना "जय भवानी जय शिवराय" लिहलेले ५०० पोस्ट कार्ड आज पाठवले.



टिप्पण्या