मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी,डॉक्टर, नर्स यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान.


नांदेड /प्रतिनिधी/आशिष कल्याणे
                  
                                            महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मुदखेड शिवसेना शहरप्रमुख सचिन चंद्रे यांच्या पुढाकारातुन शिवसेना शहर शाखेच्या वतीने मुदखेड येथील नगर परिषदेत काम करणारे सफाई कर्मचारी , न.प. कर्मचारी तसेच मुदखेड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असलेल्या कोरोना केअर सेंटर मधील कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स  यांचा कोरोना  योध्दा म्हणुन सन्मान करण्यात आला.यावेळी विश्वंभर पा.पवार निवघेकर  (शिवसेना भोकर विधानसभा प्रमुख),संजय पा.कुरे (शिवसेना तालुकाप्रमुख),पिंटू पा.वासरीकर (पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी),सुरेश शेटे (मार्केट कमिटी संचालक),सचिन पा.माने (शहर प्रमुख), अंकुश मामिडवार (युवासेना शहर),गुलाबराव देशमुख (शिवसेना उपतालुकाप्रमुख,पवन अटकलवाड निवघेकर (शिवसेना सोशल मिडीया तालुका प्रमुख) ,संजय पा.गाढे,गंगाधर पा.मगरे व पत्रकार संजय कोलते  आदीची  यावेळी उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या