मुदखेड शहरात कोरोंनाचे नवीन ०९ रुग्ण आढळले


मुदखेड/शहर प्रतिनिधी /अतीक अहेमद

     नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता १७०० च्या घरात झालेली दिसत आहे कोरोनामुक्त झालेल्या मुदखेड शहरात नवीन ०९ पाॅजिटीव रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून शहराचे वातावरण पार ढवळून निघाले आहे

        मुदखेड शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण ०५ जुलै रोजी आढळला होता मुदखेड शहरात एकूण  पाॅजिटिव रुग्णांची संख्या ०७  होती १४ दिवस कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्या ०५ जणांना एकाच दिवशी कोवीड सेंटरमधून सुट्टी करण्यात आली परिणामी मुदखेड शहर कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी निःश्वास सोडला.परंतू तो आनंदाचा क्षण मुदखेडवासियांच्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकू शकला नाही.जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी लाॅकडाऊनचा नियमांत बदल करुन कांही अटींच्या अधीन राहून बाजारपेठ सुरू करण्यासाठी परवानगी दिली परंतू शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मात्र दिवाळीच्या खरेदीसाठी निघाल्यागत बाजारपेठेत गर्दी करुन चैन तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परिणाम सर्वांच्या डोळ्यासमोर असून प्रशासनाच्या नियमानुसार वागाल तरच ठिक असल्याचे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे.

             मुदखेड शहरातील एकूण २९ जणांचा स्वॅब घेतल्यानंतर ०९ जणांचा रिपोर्ट पाॅजिटिव आला असून २० जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.या ०९ रुग्णांना कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मुदखेड शहरातील १७ वार्डातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन १७ पथकामार्फत तपासणी करण्यात येत असून ६८ कर्मचारी यांत तपासणी करीत असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कपील जाधव यांनी न्यूज पोर्टल मातृभूमि शी  बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या