नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मुदखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि.३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष इजि. विश्वंभर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुदखेड तालुका व शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करण्यात आला.तसेच जिल्हाध्यक्ष इजि विश्वंभर पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शेख साबेर भाई, महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राहुल चौदंते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पाटील नटुरे, जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया महादेव पाटील व्यवहारे, भोकर विधानसभा उपाध्यक्ष विशाल महाजन, मुदखेड तालुका अध्यक्ष आनंद टिप्परसे, मुदखेड शहराध्यक्ष महंमद बुराण, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष गजानन कल्याणकर, आदींची उपस्थिती होती.
या बैठकी प्रसंगी इजि. जिल्हाध्यक्ष यांनी तालुका व शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की भोकर विधानसभेत गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शाखा स्थापन करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची आव्हान यावेळी करण्यात आले.यावेळी निवड करण्यात आलेल्या मध्ये मुदखेड महिला तालुकाध्यक्ष पदी मायाताई हाटकर तर महिला शहर अध्यक्षपदी रुक्मिणीबाई गंगाधर कुंचटवाड यांची निवड करण्यात आली.तसेच अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी शेख मुखीद शहर अल्पसंख्यांक अध्यक्षपदी शेख इरफान शेख मुस्तफा, तालुका संघटक पदी जळबाजी हाटकर, तालुका सचिव दिलीप सरोदे, यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले ज्ञानेश्वर गायकवाड, पठाण सलमान खान, शेख खाजा, शेख हुसेन, गोपाल सूर्यवंशी, बबन पाटील, विनायक देशमुख, आनंदा निखाते, शेख सादूला, म.समी, अशोक चंदर चव्हाण,म. हकीम, शेख नफीस, महंमद खाजा, अजय राठोड, बबन गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा