किराणा दुकान,पाणटपरी, घराच्या आड खुलेआम दारुची विक्री
मुदखेड / तालुका प्रतिनिधी
मुगट येथील मुख्य रस्त्यावर ( नवी आबादी) पान टपरी, किराणा दुकान, घरातून अवैद्य दारूची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. या अवैद्य दारूची विक्रीची दुकाने दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्हा परिषद शाळे पासून केवळ दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर व मुदखेड मुख्य रस्त्यावर एक नाही दोन नाही तर दहा ते बारा ठिकाणावरून अवैद्य दारूची जोमाने विक्री होत आहे.
हा सर्व व्यवसाय मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे अनेक लोक या मुख्य रस्त्यावर आपली वाहने उभी करून दारू सेवन करत आहे. रात्रीच्या वेळेस दारुड्यांचा बाजार भरल्यासारखा दिसतो हा सर्व व्यवहार शासकीय अधिकाऱ्यांचे हात ओली करून चालत आहे.असे दारू विक्री करणारे म्हनत आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी केवळ महिन्याला भेटीसाठी येतात त्यामुळेच या अवैद्य दारूची दुकाने दिवसेंदिवस वाढतच आहे. असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे या परिसरात व शेजारी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे . काम न करण्याच्या वृत्तीमुळे या दारूच्या व्यवसायाकडे अनेक लोक वळत आहेत.परिसरातील खांबाळा धनज,सरेगाव,आमदुरा तसेच नांदेड, मुदखेड, उमरी प्रवास करणारे अनेक तळीराम या ठिकाणी दारू पिण्यासाठी विशेष थांबा घेत आहेत. त्यामुळे रात्रीला या मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहेत.
अवैद्य दारू दुकानाला मुदखेड, नांदेड येथून दारूचा सुरळीत पुरवठा चारचाकी व दुचाकी वाहनाने दररोज केला जातो तर मुदखेड येथील काही तांड्यावर ऊन गावठी दारूचा पुरवठा सुद्धा केला जातो.
या व्यवसायात दिवसेंदिवस अनेकजण उतरत आहेत त्यामुळे मुगट मध्ये दारू विक्री करणाऱ्या मध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे.त्यामुळे दारूचे दर कमी करुन दारुची विक्री सुरू आहे. गावातील कमी वयातील मुलं या दारूच्या व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे गावात गुंड प्रवृत्तीची मुले भांडणे, तंटे घडून येत आहे. याच मुख्य रस्त्यावरील दारूच्या दुकानात पेट्रोल पंपावरील चोरी करून चोर या ठिकाणी रात्रीला दारू पीत बसले होते अशी गावात चर्चा आहे.
गावातील ही अवैद्य दारूची दुकाने बंद करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेणार की नाही या बद्दल प्रश्न च आहे. तरीसुद्धा प्रशासनाने व संबंधित विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन गावातील अवैध दारूची दुकाने कायमची बंद करावी अशी मागणी गावातील ज्येष्ठ मंडळीकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा