मुगट / प्रतिनिधी
मुगट येथील जिल्हा परिषद शाळेतील ११ पैकी ६ विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या परिक्षेत कु.शीतल गजानन कल्याणे, पवार प्रनव प्रभाकर,डाके ज्ञानेश्वर नरहारी, हाटकर ऋषीकेश गंगाधर, हाटकर यश चंद्रकांत, हाटकर प्रनव प्रकाश हे विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत ६ एप्रिल रोजी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम. एम. एस) ची परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात आली होती मुदखेड तालुक्यातील अनेक शाळांनी यात सहभाग घेतला होता. या परीक्षेमध्ये मुगट जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यावर्षी चमकले आहेत.
प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळेने या वर्षीच्या परीक्षेत चांगलेच यश संपादन केले आहे. कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्याने घरी राहून या परीक्षेचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला व वेळोवेळी विषय शिक्षकांचे मार्गदर्शनामुळे या परिक्षेत विद्यार्थ्यांना चांगले घवघवीत यश संपादन करता आले.
परिक्षेसाठी शाळेतील एकच मुलगी व दहा मुले असे एकूण अकरा विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यात माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा पाटील कल्याणे यांची मुलगी शितल कल्याणे ही एकच मुलगी शाळेतून परीक्षेत बसली होती तीने या परीक्षेत यश संपादन केले आहे.
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक सौ अरुणाताई कल्याणे (जिल्हा परिषद सदस्य) भीमराव पा. कल्याणे (संचालक), कांताबाई वंजे सरपंच, जिजाबाई कल्याणे( उपसरपंच), प्रल्हाद कल्याणे, दादा पाटील कल्याणे, तुकाराम मुंगरे( मुख्याध्यापक) सर्व शिक्षक व कर्मचारी ,पालक यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा