मुदखेड / प्रतिनिधी
बारड येथील सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित सर्वांसोबत प्रेमाने वागणारे हसतमुख चेहरा सामाजिक चळवळीतील एक अग्रेसर नाव सर्वांच्या प्रती मदतीची भावना ठेवणारे त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क पिराजी गाडेकर यांची नुकतीच राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा मुदखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार अविनाश घाटे युवा मोर्चा प्रदेश उपअध्यक्ष मारोतरावजी वाडेकर जिल्हाध्यक्ष गंगाधररावजी कावडे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेशभाऊ देशमुख बारडकर देगलूर तालुकाअध्यक्ष शिवाजीमामा कनकंडे
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिराजी लक्ष्मणराव गाडेकर यांच्या सामाजिक कार्याची व त्यांचा असलेला जनसंपर्क पाहून राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चाच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी गणपत गायकवाड पत्रकार डी टी सूर्यवंशी, माधवसिंह ठाकुर,संजय खंडागळे शेंबोलीकर, पुंडलिक लिंगायत,जय गायकवाड, शिवराज केदारे इत्यादींची उपस्थिती होती.
या निवडीचे सर्व जिल्ह्यातून पुढील कार्यासाठी मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![]() |
| मातृभूमी न्युज नेटवर्क कडून आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! |



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा