मुगट जिल्हा परिषद गटातील विकास कामांना मिळणार गती.
मुगट /प्रतिनिधी
दि.१८जुलै २०२१ रोजी रविवारी सकाळी ११. वाजता, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुगट जिल्हा परिषद गटातील अनेक विकासकामांना शुभारंभ करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या काळात विकास कामांची गती कमी झाली होती तरी सुद्धा चव्हाण साहेबांनी आपल्या भोकर मतदारसंघात विकासासाठी निधी मोठ्या प्रमाणात घेचुन आनला आहे तसेच विविध विकास कामांसाठी निधी ची कमतरता सुध्दा भासू दिली नाही.
मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगांव येथे २३५ लक्ष रु निधीच्या विविध विकास कामांचे उद्धघाटन व भूमिपूजन व वसंतवाडी येथे ०५ लक्ष रु निधीच्या कामांचे उद्धघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मंत्री नांदेड मा. ना. अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख उपस्थिती मा. आ. अमरनाथ राजूरकर सदस्य, विधानपरिषद,मा. सौ. मंगारांणी अंबुलगेकर अध्यक्षा जि.प.नांदेड,मा. गोविंदराव शिंदे नागेलीकर संचालक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड तथा अध्यक्ष, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी.मा. गणपतराव तिडके चेअरमन भाऊराव चव्हाण उद्योग समूह,मा. रोहिदास जाधव माजी, सदस्य जि.प. मुगट गट, मा.सौ. अरुणाताई भिमराव पा. कल्याणे सदस्या, मुगट जि.प. गट,मा. आनंदराव गादीलवाड उपसभापती, पंचायत समिती मुदखेड.मा.म्हैसाजी भांगे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी मुगट जि.प. गटातील व मुदखेड तालुक्यातील आजी/माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्धवराव पवार निवघेकर अध्यक्ष, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटी.मा.भीमराव पाटील कल्याणे संचालक भाऊराव चव्हाण उद्योग समूह. रामराव खांडरे डोणगांवकरअध्यक्ष, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटी (सोशल मिडिया) यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा