१ ऑगस्ट रोजी लोक अदालत मध्ये प्रलंबित कर्ज आणि एक रक्कमी परतफेड या योजनेचा लाभ घ्यावा - सुधीर करांडे
मुदखेड शहर प्रतिनिधी / अतीख अहेमद
मुदखेड शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये १ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक सुधीर करांडे यांनी सांगताना दिली.
पुढे बोलताना करांडे यांनी सांगितले की एक ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतिचे आयोजन करून तालुक्यातील कर्जा संबंधी प्रलंबित असलेले प्रकरण निकाल काढण्यासाठी या लोक अदालतिचे आयोजन केले. कर्जदारांनी काही कारणास्तव कर्जाची परतफेड ठराविक मुदतीत नाही केले किंवा वेळेवर करू शकले नाही त्यांनी या लोक अदालतिच्या माध्यमांतून बँकेत येणून संबंधित व्यक्तीला भेटून आपली जे काही प्रकरण आहे. त्या संबंधी चर्चा करावी आणि चर्चेअंती जे काही ठरल त्याअनुषंगाने प्रलंबित कर्ज निकाली अंती एक रक्कम फेडून कायमस्वरूपी आपला कर्जाचे प्रकरण बंद करून घ्यावे.
भविष्यात आपल्या बँकेशी व्यवहार मुल्यांक करून पुढे कर्ज काढण्यासाठी सुध्दा विचार करू असे पत्रकारांना सांगितले तरी या लोक अदालत मध्ये प्रलंबित असलेले कर्ज या निकाली काढण्यासाठी आपण स्वतःहुन लाभ घ्यावा प्रलंबित असलेल कर्ज परतफेड करुण बँकेला सहकार्य करण्याचे आवाहन करांडे यांनी केल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा