कळमनुरी / तालुका प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील गावचे लाडके जावाई माजी.अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीरभाऊ_मुनगंटीवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.
शेवाळा ग्रामस्थांच्या वतीने गावातील आयादेव मंदिर देवस्थान येथे विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करून माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीरभाऊ_मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये वड,पिंपळ, लिंबोळी या रोपांच्या वृक्षांची लागवड याठिकाणी करण्यात आली.
वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकरी मंडळीच्या हस्ते वृक्षारोपण करुन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला माजी उपसभापती गोपू पाटील सावंत, माजी जी प सदस्य प्रल्हाद पाटील सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंद्वार, संजयराव सूर्यवंशी,दिलीपराव कल्याणकर,चंद्रकांत सूर्यवंशी,रुपेश सूर्यवंशी,विजय सूर्यवंशी,राजेश सूर्यवंशी,राजेश्वर व्यवहारे,मधुकर चेटप,माधवराव सावंत,बालाजी सूर्यवंशी,विठ्ठल सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी,अशोक रायेवार,प्रशांत खरवडकर,बालाजी सूर्यवंशी,संदीप सावंत,तुषार सूर्यवंशी,संदीप सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी,प्रदीप सावंत,समीर सूर्यवंशी,भगवान सूर्यवंशी,सुजय सूर्यवंशी,किरण सूर्यवंशी व इतर गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा