संत कृष्णा माता संजीवनी समाधी सोहळा साजरा

   संपादक आशिष मुगटकर

पालखी :- संत कृष्णा माता संजीवनी समाधी सोहळ्या निमित्ताने गावात पालखी फिरताना.


मुगट / प्रतिनिधी

                     मुगट येथील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत कृष्णामाता यांचा संजीवनी समाधी सोहळा देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी संपन्न होतो. मुगट व परिसरातील अनेक भक्त या निमित्ताने. मातेच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.मागच्या वर्षी कोरोनामुळे अनेक भक्त दर्शना पासून वंचित राहीले होते.तर यावर्षी पाऊसामुळे अनेक भक्तांना येता आले नाही.

                संत कृष्णा माता यांच्या समाधी ची विधीवत पूजा अर्चा करण्यात आली.सायंकाळी माता पालखीत विराजमान होवून गावातील मुख्य मंदिराचे दर्शन घेत संत कृष्ण माता यांची पालखी शेवटी  मंदिरात येते. मुगट गावात अनेक देवतांची लहान मोठी हेमाडपंथी मंदिर आहेत.महाभारतात श्रीकृष्णाचे मुकुट या ठिकाणी पडले होते म्हणून या गावाचे नाव मुकुट व कालांतराने मुगुट व आज मुगट अशी दंतकथा सांगितली जाते.



                               गावात संत आत्माराम,संत देवगीर बुवा,माता फुलारी आई,संत आवली बुवा,उंबर खावल्ली,संत कृष्णा माता, कृष्ण मंदिर,शनि मंदिर,चौमुखी गणेश मंदिर, हेमाडपंथी शिव मंदिर अशी अनेक देवस्थाने आहेत.तर गावचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदीर आहे.                              गावातील प्रमुख मंदिरा पैकी संत कृष्णमाता मंदिर हे एक असून या ठिकाणी मातेची जिवंत समाधी घेतली आहे. मातेने याठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी जिवंत समाधी घेऊन पंढरपूर येथील आषाढी वारी ला गेलेल्या गावातील भक्तांना चंद्रभागेच्या  तीरावर आषाढी एकादशीच्या दिवशी भेट दिली व दृष्टांत दिला अशी आख्यायिका संत कृष्णामातेची सांगितली जाते. आजही आपल्या भक्तांना वेळोवेळी ती धावून येते  भक्तगण आपला अनुभव सांगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या