बारड ते सरेगाव खड्डेमय रस्त्याला डपक्याचे रुपडे

   मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांची होते दमछाक!


खड्डेच खड्डे :-  बारड सरेगाव रस्ता की खड्ड्यात रस्ता असे चित्र पहायला दिसत आहे.

बारड / प्रतिनिधी

                बारड ते सरेगाव खड्डेमय रस्ता बनला असल्याने मोठ्या आकाराच्या खड्डयाने प्रवास करने जीवावर बेतले जात आहे. याच परिसरातील आठ ते दहा गावे याच मुख्य रस्त्याशी जोडले आहेत. या खेड्याच्या ग्रामस्थांची याच मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना  दमछाक होत असून अनेक वेळा पडण्याच्या अपघाती घटना या ठिकाणी घडत असल्याने हा रस्ता कधी बनणार असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अनेक वेळा या रस्त्याबाबत दुधनवाडी, बोरगाव, सरेगाव, जवळा पाठक, जवळामुरार ,धनज ,पाथरड या ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत रस्ता मजबुतीकरण किंवा नूतनीकरणासाठी अनेक वेळा निवेदन दिले आहेत परंतु अद्याप या रस्त्याचा मुहूर्त लागला नसल्याने अल्प पावसातच रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे दररोज ये जा करण्यासाठी चा मुख्य रस्ता असलेल्या सरेगाव - बारड रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. हा रस्ता तसा बायपास  रस्ता म्हणून नांदेड जाण्यासाठी वाहणधारकाना सोयीचा ठरला ठरला आहे परंतु रस्त्यावरील मोठ्या खंड्याने साचलेल्या डबक्यात रस्त्यावरून प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे

नांदेड शहराला तसेच बारड बाजारपेठ येथे जाण्या - येण्यासाठी बायपास व जवळचा रस्ता म्हणून मोठ्या प्रमाणात वाहणधारकानी पसंती दिली होती परंतु या रस्त्याची पण पार वाट लागली असून बारड ते नांदेड शहराला जोडणारा हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे .

परिसरातील या गावाना जाण्यासाठी तसेच ही मधील गावे रस्त्यावर जोडीली जावीत म्हणून पंतप्रधान सडक योजने अंतर्गत या रस्त्याची उभारणी करण्यात आली होती परंतु रस्ता होवून खुप वर्ष झाले आहे.

रस्तावर कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स केले गेले नसल्याने हा रस्ता पुर्ण पणे खड्डे मय झाला असल्याने याची झळ मात्र या रस्त्यावर असलेल्या दुधन वाडी, जवळा मुरार, जवळा फाटक, सरेगाव,बोरगाव देगाव, पाथरड, कारखाना, या गावाच्या ग्रामवासीया ना सोसण्याची वेळ आली आहे. बारड ते नांदेड या शहराला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने तसेच या परिसरात तील नागरिकाना रहदारीचा सोयीच्या एकमेव रस्ता खड्डे मय झाल्याने रस्त्यावर वाहनांची वाहतूक करताना अनेक अडचणी चा सामना करण्याची वेळ आली आहे.

बारड - सरेगाव रस्ता नांदेड शहरातील बारड भोकर कडे  जाणारे दैनंदिन कर्मचारी वातानु कूलित तसेच सोयीचा रस्ता असल्या कारणाने या रस्ताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो परंतु रस्ता दुरावस्था अवस्थेत असल्याने रस्त्यावरील गावकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बाकी लोकांनी या रस्त्याकडे वरून प्रवास करण्याकडे पाठ फिरवली आहे रस्त्यावरील खड्डयामुळे अनेक अपघात घडत असून मोठ्या खड्यामध्ये टूव्हीलर धारक पडताना च्या घटना घडत आहेत.

या परिसरातील नागरिकांनचा रहदारीचा मुख्य रस्ता चा प्रश्न गंभीर बनला असून बारड सरेगाव जवळामुरार जवळा पाठक हा रस्ता धनज मुगट ला जोडण्यात यावा तसेच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावी अशी मागणी बारड, सरेगाव,दुधनवाडी, जवळामुरार,पाथरड जवळाफाटक, धनज या ग्रामवासियाकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या