नांदेड ते बासर या १००किमी. सि.सी रोडची उदघोषणा!
![]() |
मुगट / प्रतिनिधी
दि. १८ जुलै २१ रोजी मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद ग्राम रोहीपिंपळगांव येथे अंतर्गत २३५ लक्ष रु निधीच्या विविध विकास कामांचे उद् घाटन व भूमिपूजन , वसंतवाडी येथे ०५ लक्ष रु निधीच्या कामांचे उद् घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मंत्री नांदेड मा. ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
यात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम १कोटी८७लक्ष रुपये, बौद्ध घटकांच्या वस्तीत विकास कामांसाठी २७.५०लक्ष रुपये, दोन अंगणवाडी बांधकाम १७लक्षरुपये,शाळा वर्ग खोली इमारत दुरुस्ती साठी ११.२०लक्ष रुपये यांचा समावेश आहे.
या प्रसंगी या रस्त्याची दुरवस्था झालेली पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी तात्पुरती या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात येईल. यावेळी बोलतांना नांदेड ते बासर या नवीन १०० किमी दुतर्फा सिमेंट रस्त्याची उदघोषणा केली दिवाळीच्या वेळी या रस्त्याचे काम सुरू केले जाईल असे ते म्हणाले.या परिसरातील मुरुम,रेती माफियांवर व जिल्ह्यातील सर्व घटना घडामोडी वर माझे लक्ष आहे. त्यांच्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आता नवीन होनारा सिसी रस्त्याची काळजी घेणे तुमच्या सर्वांचे काम आहे.हा नवीन रस्ता १०वर्ष तरी टिकेल पण आपण तो कमीत कमी ५वर्ष तरी चांगला ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. रस्ता नांदेड- आमदुरा-शिखाचीवाडी- रोहिपिंपळगाव- वसंतवाडी मुदखेड मार्गे ते बासर असा असनार आहे.
त्याप्रसंगी आ. अमरनाथ राजूरकर, सदस्य विधानपरिषद, मा. सौ. मंगारांणी अंबुलगेकर अध्यक्ष, जि.प. नांदेड, मा. गोविंदराव शिंदे नागेलीकर अध्यक्ष, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी, मा. गणपतराव तिडके चेअरमन, भाऊराव चव्हाण उद्योग समूह,जि.प.समाजकल्याण सभापती मा. रामराव नाईक, मा. रोहिदास जाधव, अध्यक्ष नांदेड जिल्हा ओबीसी विभाग, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. उद्धवराव पवार निवघेकर, मा.सौ. अरुणाताई भिमराव पा. कल्याणे सदस्या मुगट ,जि.प.गट, मा. आनंदराव गादीलवाड उपसभापती पंचायत समिती मुदखेड, म्हैसाजी भांगे कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखेड, मा. भिमराव पाटील कल्याणे संचालक भाऊराव चव्हाण उद्योग समूह, माजी सभापती मा. रत्नाकर शिंदे,
संचालक मा. माधवराव शिंदे, मा. किशनराव मुंगल, बालाजीराव शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा. साहेबराव मोरे, मा. डॉ. माणिकराव जाधव, मा. शत्रूघन गंड्रस, मा. लक्ष्मण देवदे, मा. बालाजीराव गाढे, मा. गोविंदराव गाढे, मा. विलास हाटकर, मा. आनंदराव शिंदे, मा. रामराव खांडरे डोणगांवकर, मा. मारोती जाधव, मा. केशव कुरे, मा. मारोती बीचेवाड, मा. नागोराव जाधव, मा. संजय कोलते पत्रकार, नांदेड जि.प. अतिरिक्त मुख्यधिकारी, मा. झांपले तहसीलदार मुदखेड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व सर्व स्टाफ, गटविकासाधिकारी जाधव, विस्तार अधिकारी गायकवाड व सर्व स्टाफ, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. व सर्व स्टाफ, रोहिपिंळगांव व वसंतवाडी- रोहीतांडा ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य व गांवातील सर्व कार्यकर्ते, मुगट जि.प. गट व मुदखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा