श्रीहरीकोटाच्या मिशन कंट्रोल रुममध्ये विद्यार्थी भारावून गेले

इसरो-श्रीहरीकोटा-शैक्षणिक सहल-२०२३

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

 दि.१८ रोजी नांदेड जिल्हा परिषदे कडून आयोजित इसरो शैक्षणिक सहल आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर सह इतर ठिकाणी भेट दिली.

  प्रत्यक्ष जेथून वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह अंतराळात झेपावतात, त्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना संधी भेटली आणि त्यांच्या विद्यार्थी जीवनाचे सार्थक झाले. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथे मिशन कंट्रोल रुममध्ये प्रवेश देवून कशाप्रकारे अंतराळात उपग्रह झेपावतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. स्पेस इंजिनिअर के. जनार्दन यांनी अत्यंत सोप्या भाषेत ही जटिल प्रक्रिया मुलांना अगदी लिलया समजावून सांगितली. मिशन कंट्रोल रुममध्ये मुले भारावून ही प्रक्रिया अवलोकन करीत होते. त्यानंतर ज्या लाँचपँडवरुन उपग्रह आकाशात झेपावतात, त्या लाँचपँडवर विद्यार्थ्यांना जाण्याची संधी मिळाली. 

    प्रथम लाँचपँड दोन दाखविण्यात आला. या लाँचपँडवरुन जीएसयलव्हि तीन या आधुनिक राँकेटच्या सहाय्याने सातशे पन्नास टनापेक्षा जास्तीची उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाते. विशेषतः येथे पँडच्या शेजारीच उपग्रहाची निर्मिती करुन नंतर लाँचसाठी आणण्यात येते. व्हिएबीमधून तयार करण्यात आलेला उपग्रह प्रक्षेपणाच्या पाच दिवस आधी लाँचपँडवर आणण्यात येते व नंतरच लाँच केले जाते. 

सध्या २०२४ मध्ये मानवासह अंतराळात  जाणारे गगनयानची निर्मिती प्रक्रिया अत्यंत गतीमान पध्दतीने कार्यान्वित होत आहे. यानंतर लाँचपँड एकवर नेवून तेथील प्रक्रिया सहजसोप्या शब्दात समजावून सांगण्यात आली.

 या पँडवर लहान दर्जाचे उपग्रह तयार करण्यात येतात. विशेषतः येथे पँडवरच उपग्रह तयार केला जातो व तेथूनच उपग्रह आकाशात सोडण्यात येतो. या दोन्ही लाँचपँडमधील मुलभूत फरक विद्यार्थ्यांना अत्यंत बारकाईने व बारकाव्याने के.जगन्नाथ यांनी समजावून सांगितल्यामुळे अधिकारी, केअरटेकरसह सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

 यावेळी प्रणव प्रशांत दिग्रसकर, आयुष गोविंद चव्हाण, यश पवार, साधना होनवडजकर, रोशनी कदम,रितिका मेहेत्रे या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. 

पाहणी:-मिशन कंट्रोलरुमच्या ज्या स्थानी उपग्रह प्रक्षेपण पाहण्यासाठी देशाचे महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान, इसरोचे मुख्य डायरेक्ट विराजमान होतात, त्या स्थानी आज विद्यार्थ्यांनी बसून प्रक्षेपण प्रक्रिया समजून घेतली, असे गौरोउद् गार डॉ सविता बिरगे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी काढले.

------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या