मुदखेड तालुका प्रतिनिधी
दि.१जुलै रोजी (अजित पवार गटाचे ) राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील नवीन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी नांदेड उत्तर युवक जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमीरे , नांदेड उत्तर जिल्हा युवक कार्याध्याक्ष हणमंत नटूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मा सुरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गुणांना फळांचे वाटप करण्यात आले व तसेच शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील नवीन पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या वेळी नांदेड उत्तर जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहम्मद साजिद ,राष्ट्रवादी भोकर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शेख इरफान शेख इमाम, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान मोहम्मद मजीद, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मुखिद ,पत्रकार मोहम्मद हकीम खान दान,बालाजी बिंदगे,शिंदे पाटील पांगरगावकर,मोहम्मद सलमान मोहम्मद जाफर, आनंदा निखाते,आकाश पांडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे,सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, हेड कॉन्स्टेबल बलवीर सिंग ठाकूर, ड्रायव्हर पगलवाड यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा