बारड मंडळात अतिवृष्टी अचानक पडलेल्या धो-धो पावसाने परिसरातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  शासनस्तरावरून नुकसानीचे पंचनामे करून योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी !

संपादक आशिष मुगटकर

शेतात पाणी :- बारड जवळील शेबोली या गावातील शेतात  मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

बारड / प्रतिनिधी

        बारड मंडळात अचानक पडलेल्या पावसाने  परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अचानक बरसलेल्या अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनस्तरावरून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

नुकसान :-  बारड येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून शेतात पाणी साचले आहे.

अचानक पडलेल्या पावसाने परिसरातील नदी नाले तुडुंब पाण्याने भरून वाहत असल्याने चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे तर बारड येथील शंकर नगर पादंन वसाहत, भिमनगर ,इंदिरानगर या परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने अनेकांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करण्याची वेळ आली असून काहीजणांचा संसार उपयोगी पसारा पण वाहून गेला असल्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत परंतु तहसील प्रशासनाला मात्र या अचानक पडलेल्या पावसाची भनक नसल्याने याबाबत तहसील प्रशासनाकडे पावसाची नोंद नसल्याने बारड परिसरात अतिवृष्टी पाऊस झालेल्या घटनेची मात्र त्यांना  खबर नसल्याने नागरिकांकडून प्रशासनात हलगर्जी व्यवस्थापना बाबत  रोष व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.

भिंत पडली :- बारड येथील अचानक झालेल्या पावसाच्या पाण्याने घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर घरात पाणी घुसून काही जणांची संसारोपयोगी साहित्य पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने सध्या स्थितीत या भागातील रहिवाशी परेशान झाला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या