वाढीव वीज बिलाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक.

 वाढीव विज बिलाबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब.

संपादक आशिष मुगटकर ✒️✒️✒️
विचार पुस :- महाराष्ट्र नवनिर्माण सेने मुदखेड च्या वतीने मुदखेड येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यास वाढीव वीज बिलाबाबत विचारपूस करताना.

       नांदेड/  प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

                    मुदखेड येथे वाढीव वीज बिल कमी करा करून द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुदखेडच्या वतीने महावितरण अभियंता मुदखेड यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची त्यांनी दखल न घेताच ग्राहकांना वाढीव वीज बिल वाटप करण्यात आली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुदखेड येथील अभियंता महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २० हुन अधिक कार्यकर्ते अभियंता महावितरण कार्यालय मुदखेड या ठिकाणी सोमवारी सकाळी १०:३० दाखल झाली. महावितरण कार्यालयात उपस्थित असणाऱ्या अधिकार्‍यांना त्यांनी वाढीव वीज बिलाबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात वर जाब विचारला. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

तोडफोड :- मुदखेड येथील महावितरण कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनाचा अधिकाऱ्यांना जाब विचारला अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले व कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

.

 त्यावर त्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी कार्यालयात राज ठाकरे  यांच्या नावाने घोषणा देत त्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. विज बिल माफ न केल्यास आणखीन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून महावितरणला देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या