तालुका अध्यक्ष उध्दवराव पवार निवघेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.
![]() |
| ध्वजारोहन :- मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ध्वजारोहन करताना तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार व उपस्थित मान्यवर मंडळी. |
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड येथील तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाडा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सुद्धा प्रतिमा पुजन व पुष्पहार घालण्यात आला.
तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हैसाजी भांगे, उपसभापती तेजाबराव मुंगल, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी सरचिटणीस रामराव खांडरे डोणगांवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप गाढे, बालाजीराव खटिंग, सुरेश शेटे, पद्माकर मोटरवार, हिरामण राठोड, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा