मुदखेड /तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील ईजळी( खा.) येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते भायेश्वर पाटील मुंगल यांची मुदखेड तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
विश्वगुरु तथा भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र भाई मोदी यांचे विचार,कार्य आणि उद्देश देशातील तळागळातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविन्यासाठी एक सामाजिक संघटन असावे या उद्देशाने प्रेरित होऊन तसेच श्री.नरेंद्र भाई मोदी यांचे विचार,कार्य आणि उद्देशाने प्रेरित होऊन काम करनार्या इतर संघटनांशी समन्वय साधून श्री.नरेंद्र मोदी विचार मंच देशभर आपले संघटन मजबूत करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविभाई चाणक्य यांच्या सहमतीने,श्री.नरेंद्र मोदी विचार मंचचे नांदेड (ग्रा.)जिल्हाध्यक्ष महेश रमेशराव देशपांडे यांनी एका लेखी पत्राद्वारे भायेश्वर पाटील मुंगल यांना मुदखेड तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याचे कळविले आहे.
माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास देशाचे यशस्वी पंतप्रधान तथा विश्वगुरु श्री.नरेंद्र भाई मोदी यांचे नावाने चालणारी सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षानी दाखविला त्या विश्वासास पात्र राहून मोदीजींचे विचार,कार्य आणि उद्देश तालुक्यातील प्रत्येक गावा गावात पोहचविन्याचा निर्धार नुतन ता.अध्यक्ष मुंगल यांनी व्यक्त केला.
या निवडी चे भाजपाचे ज्येष्ठ नेते मुदखेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी,भाजपा भोकर विधानसभा मतदासंघाचे नेते प्रवीण गायकवाड,भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष हानुमंत देशमुख,भाजपा तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड,माजी सभापती भगवान पानेवार,संचालक तथा भाजपा ता.उपाध्यक्ष बालाजी पाटील खटिंग,बालाजी तेलंग,माजी संचालक गुलाब सुर्यवंशी,निळकंठ हामंद,अल्पसंख्यांक मोर्चा भाजपचे शेख रफिक,मुदखेड शहर भाजपाचे प्रा.दिनेश शेटे,संजय सोनटक्के,सतिश पाटिल मुंगल,सुभाष यरपलवाड,प्रभाकर पांचाळ,म.कबीर गुलाम दस्तगिर,शे.सद्दाम,तुळशीराम चुकेवाड,सरपंच आनंद हेमके,केशव पाटिल ढगे,माधव वाघमारे,भुजंग पाटील वडजे अदिनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा