मुगट येथे सौरपथ दिवे बनले शोभेचे खांब..

 ग्रामपंचायतचे सौर पथदिव्याकडे दुर्लक्ष.

शासकिय मालमत्तेचे खुलेआम पणे चोरी.



बॅटरी चोरी  :- मुगट येथील ग्रामपंचायतीने गावातील सौर पथदिवे बसवली होती.पण आज केवळ सौरपथ दिव्याची प्लेट व खांबच अभा आहे. बॅटरी व बल्प चोरीस गेली आहेत.

मुगट / प्रतिनिधी

           मुदखेड तालुक्यातील मुगट ग्रामपंचायत कडून चार वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यावर, धार्मिक मंदिरा जवळ,चौरस्त्याच्या ठिकाणी हे सौरपथ दिवे बसवन्यात आले होते पण आज केवळ त्या अनेक ठिकाणी सौरपथदिव्याचे नुसते खांबच त्या ठिकाणी उभे पाहायला मिळत आहेत.

           मुगट गावात सण २०१३/ २०१४ या कालावधीमध्ये गावातील मुख्य रस्त्यावर, धार्मिक स्थळा जवळ सौर पथदिवे मोठ्या प्रमाणावर बसवण्यात आली होती. या सौरपथ दिव्यातील एका बॅटरीची किंमत जवळपास सहा ते सात हजार आहे. हे सौर पथदिवे  गावात बसवल्यामुळे पावसाळ्यात रात्री-बेरात्री पाण्यामुळे विज जात होती तरीही गावात तील मुख्य रस्त्यावर, धार्मिक स्थळ जवळ या सौरपथ दिव्यांमुळे रात्रीला सतत प्रकाश असायचा. गावात हे सौर पथदिवे  दोन ते तीन वर्ष चांगल्या प्रमाणात चालली नंतर ग्रामपंचायतीने गावातील विद्युत खांबावर एलईडी लाईट बसवण्यात आले त्यामुळे या सौर पथदिव्याकडे  ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले. तरीसुद्धा काही सौर पथदिवे चालू होते तर काही  बंद पडल्यात जमा होतो.  

       याचा फायदा गावातील भुरटे चोर घेऊ लागले व दररोज कुठली  बॅटरी चोरी तर कुठला बल्प चोरी चे प्रकार सुरू झाले. हळूहळू या सौरपथ दिव्यांच्या जवळपास सर्वच बॅटऱ्या ह्या चोरीला गेल्या तर अनेक खांबाचे लाईट सुद्धा चोरीला गेली पण या चोरीच्या घटना ग्रामपंचायतला माहित असून सुद्धा त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. 

    पावसाळ्यात या सौरपथ दिव्या मुळे गावात रात्रीला चांगलाच प्रकाश असायचा पण आज हा सौर पथदिव्याचा प्रकाश आज नाहीसा झाला आहे. पावसामुळे रात्री-बेरात्री वीज बंद केली तरीही गावात या सौरपथामुळे  वीज ही कायम असायची परंतु आज ही सौर पथदिवे दिवे नसल्यामुळे याच रात्रीला वीज गेल्यावर संपूर्ण गाव अंधारात कायम राहत आहे. याचाच फायदा घेऊन गावात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. गावात दोन महिन्यातच दोन वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत.


      गावात या सौर पथदिव्यामुळे  ग्रामपंचायतीच्या विजेच्या बिलाची चांगलीच बचत होत होती व रात्रीला विशेष करून वादळी वाऱ्यासह पावसाने अंधारात सुद्धा वीज गेली तरी गावात प्रकाश राहत होता.

        आज  या प्रत्येक ठिकाणी नुसते खांब उभे आहेत. या सौर पथदिव्यांच्या बॅटरीची चोरी, बल्प चोरी व चक्क काही ठिकाणी तर या खांबाची सुद्धा चोरी झालेली आपल्याला दिसून येईल गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतचे नुकसान होत असून सुद्धा ग्रामपंचायत मात्र  या चोरांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले असून याचाच फायदा हे चोर उचलत आहेत व गावात चोरीची प्रमाणसुद्धा वाढले आहे हे नाकारता येणार नाही‌ त्यामुळे पुन्हा एकदा गावातील हे सौर पथदिवे सुरू करण्याची मागणी ही गावातील सर्वसामान्य नागरिकाकडून होताना दिसून येत आहे.

1 टिप्पणी:

लोकप्रिय बातम्या