तालुक्यातिल बुथ परत्वे भाजपा कार्यकर्त्यानी केले अभिवादन . संपादक आशिष मुगटकर
![]() |
| जयंती :- मुदखेड येथील भाजपा नेते प्रवीण गायकवाड यांच्या निवासस्थानी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली. |
दि.२५. जनसंघाचे संस्थापकिय अध्यक्ष पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंती निमित्त सबंध देशभर भाजपा कार्यकर्त्यानी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरी पंडितजीच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन आपापल्या घरी भाजपाच्या कमळ असलेला ध्वज उभारून १०५ वी जयंती साजरी केली.त्याचाच एक भाग म्हणून मुदखेड येथील भाजपा नेते प्रवीण गायकवाड यांच्या निवासस्थानी पंडीतजीची जयंती साजरी करण्यात आली.
मुदखेड तालुक्यातील विविध बुथवर सर्व बुथप्रमुखानी केले. यात ता.अध्यक्ष शंकर मुतकलवाड यानी त्यांच्या वासरी या गावी अभिवादन केले,तर पिंपळकौठा येथे गुलाब सुर्यवंशी यानी आपल्या निवासस्थानी जयंती साजरी केली.
प्रवीण गायकवाड यांच्या निवासस्थानी ,कृ.ऊ.बा.सचे माजी सभापती भगवानराव पानेवार,संचालक तथा भाजपा ता.उपाध्यक्ष बालाजिराव खटिंग,संचालक सुरेश शेटे,माजी संचालक तथा भाजपा ता.सचिव निळकंठ हामंद,तुळशीराम चुकवाड आदी मान्यवरानी उपस्थित राहून आपला सक्रीय सहभाग नोंदऊन अभिवादन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा