भारतीय मानव कल्याणमहासमिती चे तालुका प्रमुख नियुक्त

 भारतीय मानव कल्याणमहासमितीत काँग्रेसच्या ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्ते यांना मिळाली संधी.

 संपादक आशिष मुगटकर

नियुक्ती :- ॲड. जे. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते यांची विशेष बैठक घेऊन तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

          नांदेड जिल्ह्यात भारतीय मानव कल्याण महासमिती  चे सक्रिय  कार्य  सुरू झाल्यानंतर  तालुका प्रमुखांना नियुक्ती पत्र  देण्यात आली. 

          अखिल  भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा भारतीय मानव कल्याण महासमिति चे संस्थापक वाल्मीकि   श्योराज  जीवन यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था स्थापन असुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश  चव्हाण यांनी नांदेड जिल्हा अध्यक्ष पदावर ॲड. जे. पी. पाटील यांची  नेमणूक केली आहे. 

सक्रिय कार्य करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

      दि. ६  सप्टेंबर रोजी नांदेड नवा मोंढा भागातील जिल्हासंपर्क कार्यालयात. ॲड. जे. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते यांची विशेष बैठक घेऊन तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रारंभी जिल्हा उपाध्यक्ष सेवानिवृत्त तहसीलदार बापुराव वाकोडे यांनी कल्याण महासमिती च्या कार्याचा परिचय दिला. 

               नव नियुक्त  तालुका प्रमुख पुढील प्रमाणे आहेत शेख रज्जाक सेठ( भोकर ) ,मनोज कमटे  ( मुदखेड ) बाबुराव पाटील टरकाळेकर  ( उमरी ) ,नारायणराव नरवाडे पाटील ( हदगाव  ) , रामराव  राठोड ( हिमायतनगर   ), संदीप लामदाडे पाटील ( कंधार)  , नागोराव  कदम ( नायगाव  )  यांना  नियुक्ती पत्र दिले.

 यावेळी  नगर परिषद चे माजी उपअध्यक्ष केशवराव  कदम, सचिन गायकवाड, बळवंत  जाधव यांची उपस्थिती होती.  ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्ते नव नियुक्ती मिळाली म्हणून उत्साहात होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या