शिक्षक दिन व गुरू वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड च्या वतीने आयोजित.

संपादक आशिष मुगटकर

पुरस्कार वितरण :- गुरु वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडचे प्रा कैलाश दत्तराव खानसोळे यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष  संस्थेचे अध्यक्ष श्री संजयराव देशमुख बारडकर यांच्या हस्ते देण्यात आला.

      बारड / प्रतिनिधी 

          मुदखेड तालुक्यातील  बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड  संचलित स्वा से राजाराम बापू माध्यमिक शाळा व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड आणि केम्ब्रिज इंग्लिश स्कुल बारड यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर शिक्षक दिन व गुरुवशिष्ट आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण व परिसरातील जेष्ठ शिक्षक व शाळा व कॉलेजच्या सर्व शिक्षकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला

            कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ शिक्षक,प्रमुख अतिथी दिगंबराव कदम,नागोराव मुंगल,बालकिशन इर्लेवाड यांच्या हस्ते  सरस्वती  व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन  झाली.

       ५ सप्टेंबर शिक्षक दिनी संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा गुरु वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडचे प्रा कैलाश दत्तराव खानसोळे यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष  संस्थेचे अध्यक्ष श्री संजयराव देशमुख बारडकर होते प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,श्री शितला देवी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ छायाबाई संजयराव देशमुख,सचिव रामेश्वर कोरबनवाड,, अशोकराव गव्हाणे,दिलीपराव दुर्गे,पंडितराव भोसले,शेषेराव दंडे,गौतम आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

   या पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना शिक्षक हे विद्यार्थी घडवतात त्यांच्या हातून ही सेवा अविरत घडो या शुभ कार्याला माज्या कडून शुभेच्छा शिक्षकदिनी संजयराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या वर्षी पासून १५ऑगस्ट,१७ सप्टेंबर, २६ जानेवारी व १मे रोजी ध्वजारोहण करण्याचा मान शिक्षकांना च दिला जाईल अशीही घोषणा करण्यात आली.  

          याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख, उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,श्री शितला देवी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ छायाबाई संजयराव देशमुख रामेश्वर कोरबनवाड, अशोक गव्हाणे,दिलीपराव दुर्गे,प्राचार्य हेमंत इंगळे,मुख्याध्यापक रामकीशन चुब्बेवार, प्राचार्य सचिन पाटील यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परिसरातील पालकमंडळी उपस्थित होती कोविड -१९ च्या धर्तीवर सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु वैष्णवी सावंत व स्वाती दुबेवाड या विद्यार्थिनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या