दलित वस्तीतील पाणी पुरवठा चालू करण्याची मागणी.
मुदखेड /शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील दलित वस्ती वार्ड क्रमांक एक मधील गेल्या पाच महिन्यापासून बौद्ध व मातंग वस्तीतील सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत पणे चालू करून देण्याची मागणी गटविकास अधिकारी अनंत कदम यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे
एप्रिल महिन्यापासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा पाईप लाईन फुटल्या कारणे बौद्ध व मातंग वस्तीमध्ये पाणी पुरवठा बंद असल्याने या प्रभागातील नागरिकांची पाण्याअभावी हाल-अपेष्टा होत असून वस्तीतील नागरिक पाण्याअभावी परेशान होण्याची वेळ आली आहे या प्रभागातील पाणी पुरवठा बंद संदर्भात लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांच्या कडे अनेक वेळा सांगुन चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला असल्याचे निवेदनावर नमूद करण्यात आले आहे.अद्यापही या प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याने ग्रामस्थांनी या प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याचे दालन गाठून निवेदन दिले आहे.
या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडून देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे निवेदनावर पुडंलीक सुर्यवंशी, पदमीनबाई सूर्यवंशी शोभाबाई हनुमंते, यशोदाबाई वाघमारे शांताबाई वाघमारे सत्वशीला धोतरे, सुमनबाई धोत्रे शोभा वाघमारे राहुल वाघमारे दत्त हनुमंते शशिकांत वाघमारे कमलाबाई वाघमारे हरिचंद्र धोतरे,सतिष पवार,तुकाराम कांबळे, संभाजी सोनटक्के आदीसह गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा